यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रभावित होऊन देशभक्त या पदवीने शासनाने गौरविलेले कै. आर.पी. पाटील (आण्णा) यांनी ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या मुला/मुलींची शिक्षणाची गैरसोय दूर करण्याच्या कल्पकदृष्टीने १९६० साली प्रतिकुल परिस्थितीत मोठ्या कुशलतेने व धैर्याने यशयंत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
सांगली जिल्हयातील मिरज व कवठेमहांकाळ या दोन तालुक्याच्या क्षेत्रात संस्थेच्या एकूण १० शाखा कार्यरत आहेत. कुपवाड येथे बालमंदीर, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग आहेत. भोसे, आरग येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सुरू आहेत. टाकळी बोलवाड, हिंगणगांव, तानंग येथे माध्यमिक शिक्षणाची सोय आहे. शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान न राहता ते विद्यार्थ्यांना स्वावलंबनाने जगण्यास समर्थ करणारे असाचवे या धारणेपोटी हिंगणगाव येथे तांत्रिक विभाग तर मिरज महाविद्यालयात बी.सी.ए. व एम.सी.व्ही.सी. विभाग सूरू आहेत. सुरुवातीच्या काळात संस्थेमार्फत गोरगरीब वंचित बहुजन समाजाच्या विद्याथ्यांच्यासाठी कुपवाड, समडोळी व कळंबी या गावात संस्थेमार्फत माध्यमिक शाळा सुरू करून त्यांच्या शिक्षणाची गैरसोय दूर केली. आज संस्थेची कुपवाडसह विविध गावात ८ माध्यमिक/उच्च माध्य शाळा सुरू आहेत. त्यामध्ये एकूण २७५ इतके कर्मचारी कार्यरत असून ४००० विद्यार्थी शिक्षण घेऊन आपले करिअर घडवित आहेत. कुपवाड येथील प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना अॅनिमेटेड व्हिडीओ प्रोजेक्टर द्वारे अभ्यासक्रम शिकविला जातो. तर कन्या शाळा कुपयाड येथे शिवण क्लास, ब्युटीपार्लर, रांगोळी इत्यादी वर्ग घेतले जातात.
आपल्या संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालय असावे अशी आण्णांची तिव्र इच्छा होती. आण्णांची दूरदृष्टी ओळखून मिरजेचे तत्कालीन आमदार व आण्णांचे चिरंजीव कै. प्रा. शरद पाटील यांनी १९९३ साली मिरज शहर व शेजारील कर्नाटक राज्यातील सिमावर्तीय भागातील गोरगरीब, अल्पसंख्यांक व वंचित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी मिरज शहरात कला वाणिज्य विज्ञान शाखा असलेल्या मिरज महाविद्यालय हिंदूधर्मशाळेच्या मालकीची इमारत भाडेतत्यावर घेऊन महाविद्यालयाची सुरूवात करून सिमावर्तीय भागातील व मिरज शहरातील व परिसरातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची गैरसोय दूर केली. सध्या महाविद्यालय प्रशस्त अशा स्वमालकीच्या इमारतीत भरत असून सिमावर्तीय भागातील शेकडो विद्यार्थी दर्जेदार महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत.
संस्थेच्या सर्व शाखांमध्ये जागतिक योग दिन, ऑगस्ट क्रांतीदिन, कामगार दिन/महाराष्ट्र दिन, जागतिक महिला दिन, संविधान दिन, जागतिक हृदय दिन या सारखे जागतिक दिन साजरे केले जातात, तसेच भारतीय राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्या सोबतच त्या महापुरुषांबाबत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली जाते. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रप्रेम रुजविण्यासाठी प्रसंगानुरूप क्रांतीकारकाचा इतिहास निरनिराळ्या सणांचे महत्य सांगितले जाते.
संस्थेने फक्त शैक्षणिक कार्यच केले नाही. तर सामाजिक बांधिलकी जोपाण्याचे काम केले आहे. तसेच विद्याथ्यांकडून ज्येष्ठ नागरीकांचा आदर राखला जावा मातृ-पितृ प्रेम रुजविण्यासाठी शाखेतील विद्यार्थ्यांना वृद्धसेवाश्रमास भेटीसाठी नेण्यात येते. वृक्षारोपण, परिसर स्वच्छता या सारखे कार्यक्रम घेतले जातात.